• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ...तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फटके मारा, स्वाभिमानी संघटनेच्या नेत्याचं वक्तव्य

...तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फटके मारा, स्वाभिमानी संघटनेच्या नेत्याचं वक्तव्य'शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे'

'शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे'

'शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे'

  • Share this:
अमरावती, 07 नोव्हेंबर : 'शेतकऱ्यांचे (farmers) वीज वीज कनेक्शन कापले तर वीज महावितरण कंपनीच्या (MSEDCL ) कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा व वेळ पडली तर फोन करा' असं वादग्रस्त वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं आहे. तसंच, महावितरण कार्यालय सुद्धा जाळण्यात आम्ही मागे पुढे पाहणार नाही' असा इशाराही त्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर  अमरावतीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली. 'परतीच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मात्र तरी देखील सरकारने शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत केली नाही त्यामुळे आता विदर्भ व मराठवाडाचा दौरा करतोय. 11 नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर केंद्र व राज्य सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन 12 नोव्हेंबर नंतर उभारू, असा इशारा तुपकर यांनी दिला. UPDATE : पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जखमी 'शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे त्यामुळे या रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापले तर महावितरण कार्यालय सुद्धा जाळण्यात आम्ही मागे पुढे पाहणार नाही व विनंती करून देखील वीज कनेक्शन कापले तर वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा व वेळ पडली तर फोन करा, असं वक्तव्यही रवीकांत तुपकर यांनी केलं. 'ठुमक्या'मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला 12 नोव्हेंबरपासून सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन छेडणार आहोत. तातडीने केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा अशी मागणीही तुपकर यांनी केली.
Published by:sachin Salve
First published: