मुंबई, 6 जानेवारी : भाजपचे नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राऊतांनी राणेंना जशास तसं उत्तर देत मला बोलायला लावू नका. राणेंची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील, असा प्रतिहल्ला संजय राऊतांनी चढवला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
'26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवला आहे. संजय राऊतांना सोडणार नाही, मी त्यांच्यावर केस करणार. 100 दिवस आत राहिल्यानंतर कमी दिवस राहिलो परत जावं, असं वाटत असेल. परत जायला रस्ता मोकळा करत आहे,' असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. 'आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी कोण कोणाशी बोलत आहे? मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि मग या, दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
'माझ्या नादाला लागू नका, तुम्ही 50 वर्ष सुटणार नाही', संजय राऊतांचा नारायण राणेंवर पलटवार#SanjayRaut #NarayanRane pic.twitter.com/JidtnjjFuC
— News18Lokmat (@News18lokmat) January 6, 2023
'मला जेलमध्ये घालत आहात, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? मला कोण कोण जेलमध्ये टाकायच्या गोष्टी करत आहे, या सगळ्याच्या नोंदी मी चीफ जस्टीसना पाठवल्या आहेत. नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्ष सुटणार नाहीत,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Sanjay raut