...तर माझे कार्यकर्ते त्याला नांगराखाली घेतील - सदाभाऊ खोत

...तर माझे कार्यकर्ते त्याला नांगराखाली घेतील - सदाभाऊ खोत

"आपण हातकणंगलेमधूनच निवडणूक लढवणार आहोत" असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना आव्हान दिले आहे.

  • Share this:

विशाल माने, प्रतिनिधी

परभणी, 26 डिसेंबर : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी, "तुमची जमीन आहे त्याच ठिकाणी राहणार आहे, घर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जर, जमीन कोणी दुसर नांगरायला आलं, तर त्याला माझे कार्यकर्ते नांगराखाली घेतील" असं वक्तव्य केलं आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं ते बोलत होते.

सदाभाऊ खोत हे आज परभणी जिल्ह्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पाथरी इथं कार्यकर्ता मेळावा सुरू असताना खोत यांनी, " कृषी खातं माझ्याकडे आहे, या दुष्काळाला आणि कर्जाला न डगमगता आपल्याला काम करायचं आहे. आपण आत्महत्या करायची नाही.मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आपल्या गावात आत्महत्या होऊ देऊ नका. कर्ज आहे म्हणून कोणी घरं डोक्यावर घेऊन जाणार नाही. ही जमीन त्याच ठिकाणी राहणार आहे. पण ती जमीन कोणी नांगरायला आलं, तर त्याला माझे कार्यकर्ते नांगराच्या खाली घेतील",असं विधान खोत यांनी यावेळी केलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी लगेच सारवासारव करत, "माझे पत्रकार मित्र इथं आहेत. त्यामुळे मला जास्त वेगळ्या पद्धतीने बोलता येत नाही, मी आक्रमक नेता आहे" असं म्हणून भाषण पुढं नेलं.

सदाभाऊ खोत पुढे म्हणतात की, "शेतकऱ्याच्या आड कुणी येणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही. मी कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं आहे. मी सरकारमध्ये असलो तरी चिंता करू नका. शेतकऱ्याच्या केसाला जर कुणी हात लावला, तर तो हात मागे कसा जाईल, यासाठी तुमचा हात पुढे आला पाहिजे, ही भूमिका आणि शिकवण मी माझ्या कार्यकर्त्यांना दिली आहे."

त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला."कोण काय म्हणतो याकडे लक्ष देऊ नका. आता कामाला लागा. काही दिवसांत लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर मी ही त्या रिंगणात उतरणार आणि माझा मतदारसंघ तर तुम्हाला माहितच आहे. आपण हातकणंगलेमधूनच निवडणूक लढवणार आहोत", असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना आव्हान दिले आहे.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 08:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading