मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...नाहीतर MPSC परीक्षा केंद्र फोडून टाकू, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

...नाहीतर MPSC परीक्षा केंद्र फोडून टाकू, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

 पुन्हा एकदा शांत होत असलेली मराठा आंदोलनं आता आणखी आक्रमक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

पुन्हा एकदा शांत होत असलेली मराठा आंदोलनं आता आणखी आक्रमक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

पुन्हा एकदा शांत होत असलेली मराठा आंदोलनं आता आणखी आक्रमक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

बीड, 04 ऑक्टोबर : 'मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत सरकारने कोणतीही एमपीएससी परीक्षा घेऊ नये अन्यथा परीक्षा केंद्र फोडून टाकू' असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या राज्य समन्वयकांनी दिला आहे.  आज बीड जिल्ह्यातील परळी शहरात मराठवाडा विभागीय स्तरावरील बैठक पार पडली. येत्या 10 तारखेच्या अगोदर नोकरभरती आणि शिक्षणातील आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय झाला नाही तर परळी शहरात 11 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन केला जाणार असल्याचे आजच्या समन्वयकांच्या बैठकीत ठरले आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. ...तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, बच्चू कडूंचे मोठे विधान, पाहा हा VIDEO आज परळी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठवाडा विभागीय स्तरीय व परळी तालुका समन्वयकांची बैठक संपन्न झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन उपस्थित होते. या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली तसेच आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत सरकारने एकही भरती करू नये, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली. सात महिन्यानंतर पुण्यातून आली आनंदाची बातमी, राज्यातील पहिली घटना 'जर सरकारने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडून टाकू' असा इशारा देखील आजच्या बैठकीत मराठा समन्वयकांनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा शांत होत असलेली मराठा आंदोलनं आता आणखी आक्रमक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मराठा आरक्षण समितीकडून महाराष्ट्र बंदची हाक दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापलं आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदला आपला पाठिंबा नसल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. अशा बंदमुळे काहीही साध्य होणार नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: बीड

पुढील बातम्या