मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...तर कॅबिनेटमधून बाहेर पडावं, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला

...तर कॅबिनेटमधून बाहेर पडावं, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला

Prakash Ambedkar on Congress: राज्यात लॉक-अनलॉकवरून सुरू असलेल्या गोंधळावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक सल्लाही दिला आहे.

Prakash Ambedkar on Congress: राज्यात लॉक-अनलॉकवरून सुरू असलेल्या गोंधळावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक सल्लाही दिला आहे.

Prakash Ambedkar on Congress: राज्यात लॉक-अनलॉकवरून सुरू असलेल्या गोंधळावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक सल्लाही दिला आहे.

अकोला, 4 जून: गुरूवार (3 जून 2021) पासून राज्यात लॉक (Lockdown)-अनलॉक (Unlock) वरून गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी अनलॉकचे पाच टप्पे पत्रकार परिषद घेत जाहीर केले. मात्र, त्यानंतर तासाभरातच राज्य सरकारकडून (Maharashtra Government) यू टर्न घेण्यात आला. राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे असं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

... तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की होईल

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याचा वापर करून काँग्रेस नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं. हे चुकीचं असून डिझास्टर मॅनेजमेंटचे निर्णय लागू झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा हा निर्णय उद्या लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की होईल. राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक संदर्भात सुरू असलेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे.

Lockdown की Unlock? अनलॉकची घोषणा करून वडेट्टीवार नागपुरात तर जनता संभ्रमात

...तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेस मंत्र्याचा अपमान होत असेल तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं. एकेकाली शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीकाही करायची अश्या दोन गोष्टी एकावेळी चालत नाही. काँग्रेसने सुद्धा तेच करावं, टीका करायची असेल तर टीका करा आणि सत्तेत रहायचं असेल तर सत्तेत रहा.

विजय वेडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केला तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदलून दुसरा नियम लागू केला तर हा मंत्र्यांचा अपमान आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Maharashtra, Prakash ambedkar