• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • '..तर एका क्षणात ईडी आणि सीबीआय थांबेल', चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सूचक सल्ला

'..तर एका क्षणात ईडी आणि सीबीआय थांबेल', चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सूचक सल्ला

'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल क्लीन चिट दिली म्हणून ढोल वाजवून ढोल फुटले'

'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल क्लीन चिट दिली म्हणून ढोल वाजवून ढोल फुटले'

'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल क्लीन चिट दिली म्हणून ढोल वाजवून ढोल फुटले'

  • Share this:
सांगली, 30 ऑगस्ट : 'आमच्या पार्टीमध्ये कुणीही असेल ज्याने चूक केली किंवा मी करेल त्याच्यावर कारवाई होईल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. नाथाभाऊंनी (eknath khadse) काही केलं नाहीतर छळण्याचा काय प्रश्न आहे, एका क्षणाला ईडी (Ed) आणि सीबीआय (cbi) थांबतील' असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलं. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. 'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल क्लीन चिट दिली म्हणून ढोल वाजवून ढोल फुटले. सीबीआयने संध्याकाळी थप्पड लावल्यानंतर सर्वजण चिडीचूप बसले. बहुदा अशा पुड्या सोडणाऱ्यांवर सीबीआय कारवाई करू शकते, असं माझं कायदेशीर मत आहे. त्यांनी करावं का नाही करावं माहीत नाही. नाहीतर पुन्हा संजय राऊत म्हणतील दादांच्या सांगण्यावरून सीबीआय चालते' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. गवत कापायला गेलेल्या महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडल्याने मृत्यू 'खोटं बोला पण रेटून बोला ट्रेंनिग क्लासेस चालवावी. सरकार जेव्हा जाईल त्यावेळी त्यांनी ट्रेंनिग क्लासेस चालवावी' असा टोलाही पाटील यांनी  महाविकास आघाडी सरकारला लगावला. 'मी काय बोललो तर सामनामध्ये माझ्यावर अग्रलेख येईल. त्याच पुस्तक तयार होईल. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर करण्याचा प्रयत्न केला गेला. मंदिर उघडणे काँग्रेस-राष्ट्रवादीला चालणार नाही. पण शिवसेनेला चालणार नाही का? का खुर्चीसाठी मंदिरं उघडणार नाही. खुर्चीवर प्रेम करणारे उद्धव ठाकरे आहेत. संजय राऊत शिवाय कोणी बोलताना दिसते का? दिवाकर रावते, अनिल देसाई कुठे गेले हे.. कारण ते खरे बोलतायत त्यामुळे त्यांना बोलून दिले जात नाही. पण संजय राऊत यांच्या स्टाईलचे मला कौतुक वाटते' असा टोलाही पाटील यांनी लगावला. शेजारीच उठले एकमेकांच्या जीवावर!; क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी वार 'राम कदम म्हणाले नियम द्या त्या नियमाचे पालन करून दही हंडी करू. तिसरी लाट येण्याचा धोका सर्वच जाणतात. काळजी घ्यायला पाहिजे सर्वाना कळते. परंतु,  दारूची दुकान चालू आहे, त्याला बोनस म्हणून तीर्थ येतं, पण नियमाच्या चौकटातून बसून मंदिर सुरू केली पाहिजेत, अशी मागणीही पाटील यांनी केली. 'अलमट्टीची उंची वाढणं हे महाराष्ट्रसाठी घातक आहे. महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सरकारला सांगून याला विरोध केला पाहिजे. ऑलरेडी उंची वाढली आहे. ती दाबून वाढवली आहे. आणखी उंची वाढली की लगतच्या गावांना धोका निर्माण होईल, असा दावाही पाटील यांनी केला.
Published by:sachin Salve
First published: