गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी चोरी, चौकीदारावर संशय

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी चोरी, चौकीदारावर संशय

वाघेला यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

गांधीनगर, 18 मार्च : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या घरी 3 लाख रुपये आणि इतर साहित्य चोरी झाल्याची माहिती आहे. याबाबत गांधीनगर पोलीस स्थानकात शंकरसिंह वाघेला यांच्या वतीने त्यांच्या एका नातेवाईकाने तक्रार दाखल केली आहे.

वाघेला यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. वाघेला यांचे नातेवाईक सूर्यसिंह चावडा यांनी याबाबत तक्रार दाखल करताना 3 लाखांची रोकड आणि 2 लाखांचे दागिने चोरी झाले असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असंही म्हणण्यात आलंय की, 'चार वर्षांपूर्वी आम्ही घरी बासुदेव नेपाली या सुरक्षारक्षकाला नोकरीवर ठेवलं होतं. तो आपल्या पत्नी आणि मुलांसह इथं राहत होता. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी अचानक आपल्या कुटुंबासह निघून गेला आहे.'

तक्रारीनंतर पेथापूर पोलीस स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

SPECIAL REPORT : युती झाली, आघाडी झाली पण राणेंचं चाललंय काय?

First published: March 18, 2019, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading