Home /News /maharashtra /

उदयनराजेंच्या निवास्थानातून चांदीच्या बंदुकीची चोरी, अखेर पोलिसांनी तरुणाला पकडले

उदयनराजेंच्या निवास्थानातून चांदीच्या बंदुकीची चोरी, अखेर पोलिसांनी तरुणाला पकडले

चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब, दीड किलो वजनाची 1 लाख 4 हजार रुपये किंमतीची चांदीची बंदूक आढळून आली.

    किरण मोहिते, प्रतिनिधी सातारा, 10 नोव्हेंबर : साताऱ्याचे  (satara) भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्या जलमंदीर पॅलेस येथून शोभेची चांदीची बंदूक (Silver gun) चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका कामागाराला अटक करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेसमधून दीपक पोपट सुतार या 34 वर्षीय तरुणाने चांदीची बंदूक चोरली होती. साताऱ्यातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. बंदूक विक्री करण्यासाठी आलेल्या या चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब, दीड किलो वजनाची 1 लाख 4 हजार रुपये किंमतीची चांदीची बंदूक आढळून आली. अजितदादा इज बॅक, सुप्रिया सुळेंनी मंत्रालयातून व्हिडीओ केला LIVE सुतारकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली. दीपक सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या