पुणे जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, घरात घुसून दाम्पत्याला केली जबर मारहाण; दागिन्यांसह मोठी लूट

पुणे जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, घरात घुसून दाम्पत्याला केली जबर मारहाण; दागिन्यांसह मोठी लूट

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

  • Share this:

पुणे, 14 डिसेंबर : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी दाम्पत्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत पीडित दाम्पत्य जखमी झालं आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लोणी येथील लोणी-पाबळ रस्त्यावरच्या बांधणवस्ती या ठिकाणी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नानाभाऊ दगडू आदक यांच्या राहत्या घरी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी नानाभाऊ आदक व त्यांच्या पत्नी मीराबाई आदक यांना लाकडी दंडुक्यांनी जबर मारहाण करून घरातील रोख रक्कम व गळ्यातील मंगळसूत्र, दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा - आरोपीला पकडण्यासाठी गेल्यावर महिलांनी पोलिसांसोबत घातला तुफान राडा, VIDEO VIRAL

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, अंमलदार हागवणे, पोलीस पाटील संदीप आढाव यांनी घटनास्थळी पाहणी केली. जखमी व्यक्तींना पुण्यातील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 14, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या