धुळे, 13 ऑगस्ट : धुळ्यातील (dhule) हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्याल व सर्वोपचार रुग्णालयाच्या (hire Government Medical College and General Hospital dhule) अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे (dr pallavi saple) यांच्या घरातून चोरट्यांनी (Theft) धाडसी चोरी करुन सुमारे 7 लाख रुपयांची रोकड व 30 तोळे सोन्याचे दागिने, असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. शासकीय निवासस्थानातून झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे अधिकारी वर्गात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मोलकरिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरील वळण रस्त्यावरील चक्करबर्डी परिसरात अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांचे शासकीय निवासस्थान आहे. डॉ. सापळे या देवदर्शनासाठी बाहेर गेल्या होत्या. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर रोकड असलेली बॅग तसेच कपाटात ठेवलेले दागिने लांबवले. यात सुमारे 7 लाखांची रोकड व 30 तोळे वजनाचे दागिने होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.
20 लाख बक्षीस, 93 गुन्हे दाखल असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण
सायंकाळी त्या घरी परतल्यावर त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. यामुळे त्यांनी तातडीने धुळे शहर पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह श्वान पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी श्वानाने सुरत वळण रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. या प्रकरणी डॉ.सापळे यांच्या आईने शहर पोलिसात फिर्यादी दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, डॉ.पल्लवी सापळे या देवदर्शनाला गेल्या तेव्हा त्याच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने चोरट्यांनी कुठलीही तोडफोड न करता अथवा कडीकुलूप न तोडता अलगदपणे घरात प्रवेश केला. तसंच कपाटातील रोकड व 30 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. डॉ.सापळे यांच्या घराची एक चाबी ही मोलकरणीकडे असते. यामुळे पोलिसांनी डॉ.सापळेंच्या मोलकरिणीला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस तिची चौकशी करीत आहे.
चोरट्यांनी पुन्हा एकदा शासकीय अधिकार्यांच्या निवासस्थांनाना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे लाखोंची घरफोडी झाली होती. त्यानंतर प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्याकडेही धाडसी चोरी झाली होती. या चोर्यांचा अजूनही छडा लागलेला नसताना आता अधिष्ठाता डॉ.सापळे यांच्याकडे घरफोडी झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकार्यांच्या घरांमध्ये झालेल्या चोरी का उघडकीस येत नाहीत? असा सवालही उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.