मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...आणि संजय राठोड यांच्या गाडीसमोर दिव्यांग तरुणाने घातले लोटांगण

...आणि संजय राठोड यांच्या गाडीसमोर दिव्यांग तरुणाने घातले लोटांगण

 आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने...

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने...

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने...

mभास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 20 मार्च : दिग्रस मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले आणि लागलीच वाहन थांबवून चर्चेचे आश्वासन संजय राठोड यांनी दिले.

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने वैभव नगरातील एका दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातुन बाहेर निघता वेळी अडविली. ही घटना शुक्रवारी दुपारी 4.३० वाजताच्या दरम्यान घडली. वैभव नगरातील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता.

VIDEO: मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेची मार्शलला जबरदस्त मारहाण

मात्र बराच कालावधी होऊन त्याला भेट मिळाली नाही. अशात आमदार राठोड हे विश्रामगृह बाहेरच्या दिशेने वाहन घेऊन निघाल्याने  दिव्यांग भास्करने राठोडांच्या वाहनापुढे चक्क झोपून त्यांचा रस्ता अडविला.  यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांच्याकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली.

'पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी हा तर पळपुटेपणा', धनंजय मुंडेंची पंकजांवर जहरी टीका

भास्कर हा गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात राहतो. मात्र, त्याच्या आसपास नागरिकांना जाणे येणे साठी रास्तच नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. होणाऱ्या त्रासाला कंटाळून भास्करने रस्त्याची मागणी केली होती. परंतु,त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे तो हताश झाला. शिवाय आज तो जेव्हा आपली व्यथा मांडण्यासाठी आमदार संजय राठोड यांना भेटण्यासाठी दिग्रस येथील विश्राम भवन गेला होता. परंतु लोकांनी त्याला या ठिकाणी भेटू दिले नाही. शेवटी तो विश्राम भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ येऊन आमदार संजय राठोड यांच्या वाहनांची वाट बघत होता आणि जेव्हा आमदारांचे वाहन तिथे आले तेव्हा भास्कर आमदाराच्या गाडी समोर झोपला आणि आपली मागणी लावून धरली.

First published:
top videos

    Tags: Hiren mansukh, Maharashtra, Sanjay rathod, Shivsena