Home /News /maharashtra /

एकीकडे पोलीस भरतीची ऑफर, दुसरीकडे सरपंचपद; अजयने निवडला गावाचा मार्ग!

एकीकडे पोलीस भरतीची ऑफर, दुसरीकडे सरपंचपद; अजयने निवडला गावाचा मार्ग!

सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अजय हा एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातला उमेदवार असल्यामुळे त्याची बिनविरोध निवड झाली.

    जळगाव, 01 फेब्रुवारी : आपल्याला चांगली नोकरी (Job) मिळावी यासाठी प्रत्येक तरुण हा धडपडत असतो. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत असतो. पण, जळगावमध्ये एका तरुणाला केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी (Central Reserve Police Force) ऑफर आली पण त्याने स्पष्ट नकार दिला आणि सरपंचपदाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव इथं राहणाऱ्या 24 वर्षीय अजय अडकमोल या तरुणाने ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली. या ग्रामपंचायतीमध्ये (gram panchayat election 2021) पहिल्यांदाच अनुसूचित जातीपदासाठी सरपंचपदासाठी राखीव जागा निघाली. त्यामुळे अमोल अडकमोल हा प्रभाग दोनमधून 253 मतांनी निवडून आला होता. एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. अजय हा एकमेव सदस्य म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आला होता, असं वृत्त दैनिक सकाळने दिले आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा; SEBI ठेवणार व्यवहारावर लक्ष सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अजय हा एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातला उमेदवार असल्यामुळे त्याची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे गावातून जल्लोषातून मिरवणूक काढण्यात आली होती. अजय अडकमोल यांच्या घरात आई आणि वडिल हे दोघेही ग्रामपंचायत सदस्य राहिले होते. त्यामुळे अजयला घरातून राजकीय वारसा लाभला होता. अजयचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तसंच त्याने जेटीएम कॉलेजमधून मॅकेनिकल डिप्लोमा सुद्धा करत  आहे. कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की...; VIDEO VIRAL अजयने केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीसाठी तयारी केली होती. अखेर त्याच्या या प्रयत्नाला यश सुद्धा मिळाले होते. पण, एकीकडे सरपंचपद आणि दुसरीकडे  केंद्रीय राखीव पोलीस दलाची नोकरी असे दोन पर्याय समोर होते. पण अजयने गावाचा विचार करत सरपंचपदाचा मार्ग निवडला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gram panchayat

    पुढील बातम्या