दिवा, 07 डिसेंबर : दिवा-आगासन रस्त्यावर (diva agasan road) आत्तापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले तरीही अपूर्ण रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने आज एका निष्पाप व्यक्तीला आपला नाहक जीव गमवावा लागला. हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एक तरुणाला ट्रकने चिरडल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv) कैद झाला आहे.
दिवा आगासन रस्त्याच्या कामासाठी 2016 साली शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु, पाच वर्ष उलटून देखील या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे त्यामुळे आज या ठिकाणी भयानक घटना घडली. या रस्त्यालगत असलेल्या एका घरात आज हळदीचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक आले होते.
दरम्यान यातील तीन व्यक्ती एका बाईकवर विरुद्ध दिशेने आले होते. बाईक थांबवून खाली उतरत असताना त्यातील शेवटच्या व्यक्तीला समोरुन येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे ती व्यक्ती खाली पडताच त्याच्या अंगावरुन भरधाव वेगाने जाणारा ट्रक गेला. काही कळायच्या आताच त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या अपूर्ण असलेल्या कामामुळे सदर रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असून त्यातच डिव्हाडर घातल्याने सदरचा दुर्दैवी अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
जपानच्या एका हल्ल्यानं दुसऱ्या महायुद्धाची दिशा कशी बदलली?
या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून याला स्थानिक राजकीय नेते व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभल्याने त्यावर कारवाई होत नाही असा आरोप स्थानिक भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक Video viral
या भागात अनधिकृत बांधकामांचे साहित्य घेऊन ट्रक दिवसभर ये-जा करत असतात त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नेहमीच असते असे ते देखील त्यांनी सांगितलं.
रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकारी व आरोपी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा व प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक समाजसेवक अमोल केंद्रे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.