Home /News /maharashtra /

खेळण्यातली पिस्तुल अन् पोलिसांचा ड्रेस घालून हिरोगिरी भोवली, तरुणीने शिकवला चांगलाच धडा

खेळण्यातली पिस्तुल अन् पोलिसांचा ड्रेस घालून हिरोगिरी भोवली, तरुणीने शिकवला चांगलाच धडा

 पंढरपूर, 17 मार्च :  आपण पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) आहोत तसेच आपले वडील आयपीएस अधिकारी आहेत असं खोटे सांगून एका भामट्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष देऊन फसवणूक केल्याची घटना पंढरपूरमध्ये (pandharpur) समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या भामट्याने पोलीस अधिकारी भासवण्यासाठी खेळण्यातील पिस्तुल आणि पोलिसांचा गणवेशही घालून ड्रामा केला होता. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केले तेव्हा पोलिसांनाही त्याला पाहून हसू आवरले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सुरेश भोसले (भिसे) (वय 22 वर्ष, आंबे गाव ता.पंढरपूर) असं या भामट्याचे नाव आहे.आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत तसेच आपले वडील आयपीएस अधिकारी आहेत, असं खोटे सांगत रमेश भोसले फिरत होता. गावातील एका तरुणी पोलीस भरतीसाठी तयारी करत होती. त्याने या तरुणीला तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो असे आमिष दाखवून  तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला आणि वारंवार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले. त्यासाठी तो गेली सहा महिन्यापासून पीडित मुलगी व त्याचे घरच्याच्या संपर्कात होता. आरोपी रमेश  याने आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत. भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तुल इ. साहित्य सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व  बनावट आधारकार्ड देखील  तयार करुन घेतले होते. त्याचा उपयोग त्याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करण्यासाठी केला. आपण मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचे सांगून सदर मुलगी व तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून तिच्याशी विवाह करण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. परंतु सदर मुलीला आरोपीच्या वागण्याचा संशय आला. मुलीने मंगळवेढा पोलीस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे खात्री केली असता रमेश सुरेश भोसले या नावाचे कोणीही अधिकारी या दोन्ही पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याची माहिती मिळाली.आता आपली फसवणूक होत असल्याचे या मुलीचे लक्षात आल्यावर या मुलीने निर्भया पथक पंढरपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार निर्भया पथकाच्या पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी रमेश सुरेश भोसले (भिसे) याला बोलावून घेतले आणि निर्भया पथकातील पोलीसांनी आरोपी रमेशला ताब्यात घेवून खात्री केली. तेव्हा त्याच्याकडे आसलेल्या सॅकमध्ये खाकी रंगाचा पोलिसांचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तुल, बनावट पोलीस ओळखपत्र, आधारकार्ड मिळून आल्याने त्याबाबत त्यांच्याकडे आढळून आला. गणवेशाबाबत व साहित्याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देवू शकला नाही व त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या