SPECIAL REPORT : 'पबजी' खेळणाऱ्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं; म्हणतो, 'मीच अजित पवार'!

SPECIAL REPORT : 'पबजी' खेळणाऱ्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं; म्हणतो, 'मीच अजित पवार'!

पुण्यातील चाकणमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पबजी गेम खेळणाऱ्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

 पुणे, 03 डिसेंबर :  सतत स्मार्टफोन हाताळणारी आणि गेमिंगच्या दुनियेत वावरणारी तुमची मुलं मानसिक संतुलन हरवून बसू शकतात. पुण्यातील चाकणमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पबजी गेम खेळणाऱ्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.

पुणे जिल्ह्याच्या चाकणमधील या उच्चशिक्षित तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पबजी गेमनं त्याच्या मनावर अक्षरश: कब्जा केला आहे. त्यामुळेच तो त्या आभासी दुनियेत वावरत आहे. त्याला वास्तवाचं भान उरलं नाही. पब्जी गेममधील  भाषा त्याच्या तोंडी आहे. हा तरुण मूळचा इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी गावचा रहिवासी असून  त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय.

शाळकरी मुलांसापासून तरुणांपर्यंत सगळ्यांनाच पबजी गेमनं वेड लावलंय. मुलं तहान-भूक विसरुन तासनं तास हा गेम खेळतात. अनेकजण तर या गेमच्या आहारी गेले आहेत.

पबजी म्हणजे प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड्स.  या गेममध्ये 100 प्लेअर एका बेटावर लढाई करतात. लढत असताना त्यांना स्वत:लाही  वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी प्लेअरला वेगवेगळ्या प्रकारची अभासी शस्त्र वापरता येतात. सर्वावर मात करणारा शेवटचा खेळाडू अथवा  संघ विजेता ठरतो.

'पबजी' किंवा अन्य गेम अतिरंजक असतात. पबजी किंवा यांसारखे विविध ऑनलाईन गेम हे अतिरंजक पद्धतीने बनवलेले असतात. यामुळं मुलांना आभासी दुनियेचा भास होतो. गेमिंगच्या विश्वात रमताना त्यांच्या भावनांचा निचरा होत असतो, यामुळेचं गेम खेळणारी मुलं या गेमच्या आहारी जातात आणि मुलांना पुन्हा-पुन्हा गेम खेळण्याची इच्छा होते, असं  मानसोपचार तज्ज्ञांच्या मत आहे.

चाकणमधील  हा उच्चशिक्षित  तरुण पब्जीच्या आहारी गेल्यामुळं पब्जी खेळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, आज घरा-घरातील मुलांच्या हाती स्मार्टफोन आहेत आणि इंटरनेटच्या मायाजाळ्यात असे गेम आणि गेम खेळणारे ऑनलाईन मित्र सहज भेटतात त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांवर  लक्ष्य ठेवण्याची आवश्यकता  आहे.

First published: December 3, 2019, 9:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading