चक्रीवादळामुळे छत दुरुस्त करायला गेला अन् काळजाचा ठोका चुकला

चक्रीवादळामुळे छत दुरुस्त करायला गेला अन् काळजाचा ठोका चुकला

चक्रीवादळामुळे सुरू झालेल्या पावसात कंपनीचे छतावरील काही पत्रे गळके असल्याने दुरूस्तीकरिता हा कामगार छतावर चढला होता

  • Share this:

पालघर, 03 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे खबरदारी म्हणून कंपनीच्या छताची दुरुस्तीचे काम करत असताना मजुराचा छतावरून पडून जागीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघरमधील वाडा तालुक्यात घडली.

पालघरमधील वाडा तालुक्यातील वसुरी जवळ असलेल्या रिजेन्सी इस्पात या कंपनीमध्ये मयूर शेलार (वय 45) या कामगाराचा कंपनीच्या छतावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -VIDEO : दंडाची पावती द्या नाहीतर...भररस्त्यात तरुणीचा हायवोल्टेज ड्रामा

चक्रीवादळामुळे सुरू झालेल्या पावसात कंपनीचे छतावरील काही पत्रे  गळके असल्याने दुरूस्तीकरिता  हा कामगार छतावर चढला होता. त्यावेळी  पाय घसरून पडल्याने पत्रे मोडून तो खाली पडल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मयूर शेलार हा कामगार भिवंडी तालुक्यातील जांभिवली गावातील रहिवासी आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेलार कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

रत्नागिरीत चक्रीवादळात 4 जखमी

दरम्यान,  निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले मात्र जिवीतहानी नाही. तसंच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत 2 दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा - क्षणात झालं होत्याचं नव्हतं, निसर्ग चक्रीवादळाचे थरारक VIDEO

संपादन - सचिन साळवे

First published: June 3, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या