मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप

फक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 3 डिसेंबर: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी (Nagpur) मुंबईत (Mumbai)  होणार आहे. विशेष म्हणजे येत्या 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब  (Anil Parab) यांनी दिली आहे. मात्र, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा थेट आरोप भाजपनं केला आहे. विरोधीपक्षानं दोन आठवड्याची मागणी केली होती. पहिला दिवस शोक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या मांडणे, दुसऱ्या दिवशी मागण्या मंजूर करणे असं कामकाज असेल, अशी माहिती परब यांनी दिली आहे. हेही वाचा...MLC Election Results 2020 :अमरावतीमध्ये भाजपला जबर धक्का, अपक्ष उमेदवाराची महाविकास आघाडीला टक्कर केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं आणि पावसाळी अधिवेशनही थोडक्यात गुंडाळावं लागलं होतं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनही अवघ्या 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. मात्र, नागपुरातील आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. तसंच कोरोना काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणं शक्य नसल्यानं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आणखी काय म्हणाले  देवेंद्र फडणवीस? -राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे आधीवेशन पुढे ढकलले आहे -फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे -पावसाने, चक्रीवादळामुळे शेती नष्ट झालेली आहे. -शेतकऱ्यांच्या समस्या, विविध समाजाच्या समस्या आहेत.आज महिला अत्याचार घडत आहे. -राज्य सरकारला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची चपराक बसत आहे -पण या सरकारमध्ये अधिवेशन पुढे ढकलण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे -आम्ही दोन आठवड्याचे अधिवेशन घ्यावे अशी मागणी केली -आम्ही अध्यक्षांना स्पष्ट केले होते की अधिवेशन 2 आठवडे घ्यावे पण त्यांनी ते फेटाळून लावून -आपण सर्व गोष्टी उघडत आहात अशा परिस्थितीत केवळ अधिवेशनावर निर्बध आणले जात आहे. -अर्थ संकल्पिय अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे अशी आम्ही मागणी केली आहे काय म्हणाले प्रवीण देरेकर? - जे पूर्वनियोजित होते ते सोपस्कार या सरकारने आजच्या बैठकीत पार पाडले -आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. आज विनयभंग, बलात्कार सारख्या घटना घडत आहेत -जनजिवन विस्कळीत आहे त्यामुळे अधिवेशन दोन आठवड्याचे करा ही आम्ही मागणी केली होती. मात्र सरकारने ती मागणी फेटाळली -संसदीय कामकाज मंत्र्यांनी रेटून नेण्याचे काम केले आहे -महिलांवर विनयभंग, अत्याचार होत असताना दिशाच्या कायद्याबाबत कुठलीही हालचाल नाही -तो कायदा आणावा ही मागणी आम्ही केली -ओबीसी, मराठा समाज अस्वस्थ आहे. ते विषय घ्यावे असे आम्ही आजच्या बैठकीत सांगितले. पण अधिवेशन दोन दिवसाचे घेण्याचे सरकारने ठरवले -हे सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे -शॉर्टकटमध्ये अधिवेशन गुंडाळण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे.
First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Winter session

पुढील बातम्या