नाशिकमध्ये झोपडीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये झोपडीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

उंटवाडी रोडवर दक्षिण मुखी मारूती मंदिराजवळील भिंत एका झोपडीवर कोसळली

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 07 जानेवारी : उंटवाडी रोडवर दक्षिण मुखी मारूती मंदिराजवळील भिंत एका झोपडीवर कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी झाला आहे. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शहरातील उंटवाडी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागूनच एक झोपडपट्टी होती. या भिंतीजवळ बांधकाम सुरू होते. आज दुपारच्या वेळी काम सुरू असताना अचानक ही भिंत झोपडीवर कोसळली. भिंतीच्या ढिगाराखाली 3 ते 4 जण अडकल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाराखालून 3 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. यात एकाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रकाश सरकटे असं या मृत व्यक्तीचे नाव आहे.

जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

=====================================

First published: January 7, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading