वाल्मीच्या संचालकांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले

वाल्मीच्या संचालकांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले

दोघंही आरोपी एका असिस्टंट प्रोफेसरला नोकरीत कायम करून घेण्यासाठी या दोघांनी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून नोकरीत कायम करून घेण्याची ऑर्डर होती.

  • Share this:

औरंगाबाद,29 डिसेंबर:   औरंगाबादेत अँटी करपशन ब्युरोने मोठी कारवाई केली आहे.  वाल्मीचे डायरेक्टर हरिभाऊ गोसावी आणि जॉईंट डायरेक्टर राजेंद्र क्षीरसागर यांना 10 लाख लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

दोघंही आरोपी एका असिस्टंट प्रोफेसरला नोकरीत कायम करून घेण्यासाठी या दोघांनी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून नोकरीत कायम करून घेण्याची  ऑर्डर  होती.  त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यास आरोपी टाळाटाळ करत होते. शेवटी 10 लाखाची मागणी या दोघांनी केली होती.

तसंच ठरलेली रक्कम स्वीकारताना त्यांच्या वाल्मी येथील केबिन मध्येच पकडलं.  गेल्या दोन दिवसात औरंगाबाद एसीबी ने मोठ्या कारवाया केल्या आहेत. काल ही उपविभागीय अधिकारी सिल्लोड आणि त्याच्या स्विस सहाय्यकाला 1 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं आहे. त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील एक खूप  मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे.

First published: December 29, 2017, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading