• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मोहोळ : जिममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू

मोहोळ : जिममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू

मृत डॉ. सतीश अनंतकर

मृत डॉ. सतीश अनंतकर

सोलापूर जिल्हातील मोहोळ तालुक्यात जिममध्ये व्यायाम करताना चक्कर येऊन एका डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 • Share this:
  मोहोळ (सोलापूर),24 ऑक्टोबर: सोलापूर जिल्हातील मोहोळ तालुक्यात जिममध्ये व्यायाम करताना चक्कर येऊन एका डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहोळ येथील कुरुल रस्त्यावरील रहिवासी डॉ. सतीश अनंतकर (वय 49) हे दररोज शहरातील कुरुल रस्त्यावरीलच जिममध्ये व्यायामासाठी जायचे. शनिवारीही रात्रीही ते जिममध्ये गेले होते. साडेसातच्या सुमारास व्यायाम करत असताना त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा झाल्याचे घोषित केले. याबाबत सुभाष रामदास अनंतकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस नाईक घोगरे तपास करीत आहेत. याचा पुढील तपास पोलिस नाईक घोगरे हे करीत आहेत. डॉ. सतीश बापूराव अनंतकर असे मृताचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी आहे. शनिवारी (ता. 23) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून याची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: