ट्रकने दुचाकीला दिली धडक, सुरक्षारक्षक चाकाखाली सापडला तर मित्र...

ट्रकने दुचाकीला दिली धडक, सुरक्षारक्षक चाकाखाली सापडला तर मित्र...

तर इतर तीन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

  • Share this:

कन्हैयालाल खंडेलवाल, प्रतिनिधी

हिंगोली, 17 मे : हिंगोली जिल्ह्यातील कलगाव शिवराजवळ ट्रकने दुचाकीला ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणखाली पडून चिरडला गेला. तर इतर तीन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

ही घटना आज रविवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली. हिंगोली वाशिम महामार्गाचे काम सुरू असून या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे शिवशंकर पुरी (वय 35 वर्षे राहणार भिरडा, तालुका हिंगोली) हे रात्रपाळीचे काम आटपून आपल्या 3 सहकाऱ्यांसह दोन दुचाकीवर गावाकडे परतत होते.

हेही वाचा -शेतात काम आटोपून घरी जेवायला निघाले, समोरासमोर दुचाकीच्या धडकेत 2 तरुण ठार

सकाळी सातच्या सुमारास कलगाव पाटी शिवरात तिघेही जण पोहोचले असता भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एम एच 26 ई 4373 याने शिवशंकर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात शिवशंकर हे दुचाकीवरून खाली पडून ट्रकखाली चिरडले गेले.

त्याचवेळी शिवशंकर यांची दुचाकी समोर असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली. यात सदाशिव पुरी, विश्वनाथ पुरी व शिवाजी बन हे तिघे जखमी झाले.

हेही वाचा -मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात मिनी बसचा चक्काचूर, 5 जण गंभीर

तिघाही जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण  यातील विश्वनाथ पुरी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड इथं हलवण्यात आले आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार असून हिंगोली ग्रामीण पोलिसांत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 17, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या