रेल्वे रूळ ओलांडत होते मूकबधीर मायलेक, लोकल येत असल्याचं कळलंच नाही, आणि...

रेल्वे रूळ ओलांडत होते मूकबधीर मायलेक, लोकल येत असल्याचं कळलंच नाही, आणि...

दोघेही मुकबधीर असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना लोहमार्गावरून भरधाव येणाऱ्या रेल्वेचा त्यांना अंदाज आला नाही

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 11 फेब्रुवारी : पुणे-लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एका मूकबधीर आईचा मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यातील कान्हे रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या अपघातात तिचा सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे.

हा अपघात कान्हे रेल्वे स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास घडला. धावत्या पुणे लोणावळा लोकलची धडक लागून 26 वर्षीय रेखा शेलार यांचा जागीच मृत्यू झाला असून तिचा सात वर्षीय लहान मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला  अपघातात विराज शेलार हा सात वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेली महिला तसंच तिचा मुलगा हे दोघेही मूकबधीर असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना लोहमार्गावरून भरधाव येणाऱ्या रेल्वेचा त्यांना अंदाज आला नाही. मोटरमनने अनेक वेळा हॉर्न वाजवला पण या  मायलेकांना धावत्या रेल्वेचा कुठल्याही प्रकारचा भास झाला नाही. त्यामुळे दोघांनाही रेल्वेची जोरदार धडक लागली यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर विराज गंभीर जखमी झाला.

जखमी विराजला स्थानिक रहिवाशांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. विराजची ही प्रकृती चिंताजनक असल्याची  माहिती डॉक्टर महेश कुदळे यांनी दिली आहे.

बायकोला मारताना मुलगा रडत होता, बापाने त्यालाही बॅटने मारले, चिमुरड्याने सोडला जीव

दरम्यान, नाशिकमध्ये पती-पत्नीच्या वादात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा नाहक बळी गेल्याची घटना  घडली आहे. याप्रकरणी नराधम पित्याला नाशिक पोलिसांनी गजाआड केलं आहे. मात्रस यात लहान मुलांचा जीव गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती पत्नीच्या वादात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्यन खंडारे असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव असून गेल्या चार दिवसांपूर्वी या मुलाचा बाप आणि आई यांच्यात किरकोळ वादातून भांडण झालं होतं. याच भांडणात भीमराव खंडारे याने  आपल्या पत्नीसह पाच वर्षांच्या आर्यनला मारहाण केली. या मारहाणीत आर्यनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे या संशयित आरोपीला बेड्या ठोकत त्यास गजाआड केलंय. यात पोलिसांनी संशयित आरोपी भीमराव खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत मारहाणीत वापरलेली बॅटही ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वीही चारित्र्याच्या संशयावरून वाद झाले आहेत. मात्र, घटनेच्या दिवशी संशयित भीमराव खंडारे याने आपल्या पत्नीला मारहाण करत असताना आर्यन रडत असल्यानं त्याने आर्यनलाही बॅटने मारहाण केली आणि यातच आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या संतापजनक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

First published: February 11, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या