बदलापूरजवळील चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला

बदलापूरजवळील चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला

मुळचा सिल्वासाचा रहिवासी असणारा हा पर्यटक ट्रेकिंगसाठी चंदेरी किल्ल्यावर आला होता

  • Share this:

गणेश गायकवाड,प्रतिनिधी

28 आॅक्टोबर : बदलापूर आणि नेरळ जवळ असणाऱ्या चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला आहे. या पर्यटकाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, रात्रीवेळी खाली उतरवणे धोकादायक असल्यामुळे सोमवारी सकाळी खाली उतरवण्यात येणार आहे.

चंदेरी या डोंगरालगत गेलेला एका गिर्यारोहकाला रस्ता चुकल्याने तो डोंगरावरचा अडकला आहे. उदय रेड्डी असं त्याचं नाव असून कुळगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक आदिवासींच्या मदतीने त्याचा शोध रात्री उशिरा घेण्यात आला.

संध्याकाळी त्याला खाली उतरवायला सुरुवात झाली होती. मात्र रात्री अंधार वाढल्याने यावेळी खाली उतरणे धोकादायक असल्याने त्याला खाली न उतरवण्याचा निर्णय पोलिसांनी आणि स्थानिकांनी घेतला आहे.

या गिर्यारोहकांना खाली आणण्यासाठी पनवेल मार्गे देखील काही गिर्यारोहकांचे समूह आणि बदलापूर वरूनही काही गिर्यारोहकांचे समूह पाठवण्यात आले आहेत.

रात्री उशिरापर्यंत या गिर्यारोहकाला खाली उतरवण्यात आले नव्हते. हा गिर्यारोहक एकटाच कसा काय वरती गेला याबाबतही पोलिसांकडे पुरेशी माहिती नाही. मोबाईलवर संपर्क होत नसल्याने अधिक माहिती पोलिसांना देखील मिळू शकलेली नाही.  पोलीस आणि बचाव यंत्रणा सकाळ उजाडल्यानंतर त्याला खाली आणण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चंदेरी किल्ल्याबद्दल

बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर चिंचोली नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरी किल्ल्याला जाण्याचा मार्ग आहे. चिंचोली गावातून समोर दोन उत्तुंग असे डोंगराचे सुळके दिसतात. त्यापैकी एक म्हैसमाळ आहे, तर दुसरा डोंगर म्हणते चंदेरी दुर्ग किल्ला आहे. नाखिंड,चंदेरी,म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक आणि पनवेलच्या प्रभामंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी किल्ला आहे.

========================

VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकला १० वर्षांच्या मुलाचा हात

First published: October 28, 2018, 10:06 PM IST

ताज्या बातम्या