उल्हासनगर, 04 डिसेंबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. एका चोराने (thief ) चोरलेली चिल्लर मोजतांना पोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. या चोराने उल्हासनगर (ulhasnagar) मधील एका मंदिराच्या दानपेटीतून तब्बल 3 हजारांची चिल्लर चोरली होती. सध्या हिल लाईन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितकुमार लोधी असं चोराचं नाव आहे. लोधी हा कैलास कॉलनी भागातून आपल्या खांद्यावर एक मोठं बोचकं घेऊन जात होता. याच वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून बोचक उघडून बघितल्यावर त्याला मोठ्या प्रमाणात चिल्लर पोलिसांना आढळली.
'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? नागपुरात काँग्रेसच्या गोटात रंगली चर्चा
ही चिल्लर ३ हजार रुपयांची होती. त्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उल्हासनगर च्या चालीया मंदिराच्या शेजारी असलेल्या एका मंदिरातील दान पेटीचे लॉक फोडून ही चोरी केल्याचे समोर समोर आले. या सगळ्या प्रकारची माहिती हिल लाईन पोलिसांनी (hilline police station) मंदिराच्या विश्वस्तांना दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चोरटा ललितकुमार लोधी हा याच मंदिरात पूर्वी सुरक्षारक्षकाचे काम करत होता, मात्र त्याने काम सोडून दिले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिलिंद गुणाजी यांच्या मुलाची झाली एंगेजमेंट ; भावी सून करते हे काम..
सुरुवातीला हा चोर बोचक सोडून जेव्हा पळून जात होता, त्यावेळेस हिललाइन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडील बोचक उघडून बघितल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात चिल्लर होती, त्यामुळे चोरलेली ही रक्कम एका मंदिराच्या दानपेटीतील असेल असा संशय आम्हाला आला होता. त्यानुसार आमच्या पोलिसांनी विविध मंदिरात जाऊन यासंदर्भात ची तपासणी करत चौकशी केली. त्यावेळी उल्हासनगरच्या चालिया मंदिराबाहेर असलेल्या एका छोट्या मंदिरातील दानपेटीतील ही रक्कम असल्याचं समोर आलं. त्यानंतर मंदिरातील सुरक्षारक्षकाने येऊन या संदर्भाची रितसर फिर्याद दिल्यानंतर या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.