• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ठाकरे सरकार आता फक्त..., नारायण राणेंची नवीन भविष्यवाणी

ठाकरे सरकार आता फक्त..., नारायण राणेंची नवीन भविष्यवाणी

'शिवसेनेला धुवायचं माझं काम आहे. त्यांचा खासदार विनायक राऊत हा बिना कामाचा खासदार आहे'

'शिवसेनेला धुवायचं माझं काम आहे. त्यांचा खासदार विनायक राऊत हा बिना कामाचा खासदार आहे'

'शिवसेनेला धुवायचं माझं काम आहे. त्यांचा खासदार विनायक राऊत हा बिना कामाचा खासदार आहे'

 • Share this:
  बुलडाणा, 31 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे भाजपचे (bjp) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा सरकार पडण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. हे सरकार साडेसात दिवसांमध्ये पडणार, असा नवीन दावाचा राणेंनी केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात चिखली येथे उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रमाला नारायण राणे हजर होते. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पांडुरंग पांडुरंग, वाखरीत ग्रामपंचायतीने 23 बिअर शॉपींना दिली परवानगी 'महाविकास आघाडी सरकार हे सत्तेवर आले पण हे त्यांच्याच अंतर्गत वादाने पडणार आहे. हे सरकार आता आता फक्त साडे सात दिवस टिकणार आहे, असा दावा राणेंनी केला आहे. तसंच,  शिवसेनेला धुवायचं माझं काम आहे. त्यांचा खासदार विनायक राऊत हा बिना कामाचा खासदार आहे. चेंबूरचा तो माहिती देणारा व्यक्ती हा भाजपचा असून माझा मित्र आहे. तो ED च्या लोकांना चांगली माहिती देतो, असंही राणे म्हणाले. IND vs IND: ...अन् सामन्यादरम्यान घाबरली हिटमॅन रोहितची पत्नी रितिका तसंच, मराठवाड्यातील लोक बुलडाण्यात येऊन बँकांकडून कारखान्यांसाठी कर्ज घेतात, असं म्हणत नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांचं नाव न घेता टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून बुलडाणा अर्बन या बँकेवर अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या त्यांच्या कारखान्यांसाठीच्या कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. हाच मुद्दा हेरत  नारायण राणे यांनी 'मराठवाड्यातील लोक बुलडाण्यात येऊन कर्ज घेतात' असं म्हणत अशोक चव्हाणांवर निशाणा साधला होता.
  Published by:sachin Salve
  First published: