Home /News /maharashtra /

'पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धविहार', अभ्यासकाच्या दाव्यामुळे खळबळ

'पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धविहार', अभ्यासकाच्या दाव्यामुळे खळबळ

फक्त विठ्ठल मंदिरच नाहीतर देशातली अनेक मंदिर आहे ही कधी काळी बौद्ध लेण्या किंवा बौद्ध विहार होती

फक्त विठ्ठल मंदिरच नाहीतर देशातली अनेक मंदिर आहे ही कधी काळी बौद्ध लेण्या किंवा बौद्ध विहार होती

फक्त विठ्ठल मंदिरच नाहीतर देशातली अनेक मंदिर आहे ही कधी काळी बौद्ध लेण्या किंवा बौद्ध विहार होती

नागपूर, 25 मे :  सध्या देशात मंदिर मशिदीचा (Gyanvapi Masjid)  वाद सुरू आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे देशभरातले वातावरण ढवळून निघाले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पंढरपूरमधील (pandharpur vitthal mandir) विठ्ठल मंदिर हे बौद्धविहार आहे  त्यामुळे ते बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, असा दावा ज्येष्ठ अभ्यासक आणि प्राध्यापक प्रदीप आगलावे (Professor Pradeep Aglave) यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहे. बौद्ध धर्म अभ्यासक प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी दावा केला आहे की, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे मुळात बौद्ध विहार आहे. पंढरपूरची वारीची परंपरा, तिथी, मंदिराचे स्थापत्यकला पती-पत्नी यामधून याचे पुरावे मिळतात, असा दावा आगलावे यांनी केला. फक्त विठ्ठल मंदिरच नाहीतर देशातली अनेक मंदिर आहे ही कधी काळी बौद्ध लेण्या किंवा बौद्ध विहार होती, असंही आगलावे म्हणाले. आजही पंढरपूरच्या मंदिराची पाहणी केली, तिथे गौतम बुद्धाच्या मूर्ती पाहण्यास मिळत आहे. एवढंच नाहीतर ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यांच्यासह  अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. आमही विहारं पाडून तिथे मंदिरं आणि मशिदी उभारण्यात आल्या, असा दावाही आगलावे यांनी केला.  विठ्ठल मंदिर हे बौद्धविहार नाहीच ;वारकरी संप्रदायाकडून खंडन दरम्यान,  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सह देशातील अनेक मंदिरे ही पूर्वीची बौद्धविहार असल्याचा दावा साहित्यिक प्रदीप आगलावे यानी केला आहे. पण समाज एकत्र करत असताना ज्या विषयाचे अनेकवेळ खंडन झालेले आहे. असे विषय पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर आणून प्रसिद्धी मिळवण्याचे काम ते करत असल्याचा आरोप केलाय रामकृष्ण विर महाराज यांनी केला. (IPL 2022 Eliminator : लखनऊ-बँगलोरसाठी 'करो या मरो', पावसामुळे टॉसला उशीर) तर प्रदीप आगलावे यांनी केलेली मागणी ही हास्यास्पद आहे. सांप्रदाय हा अनुभूतीवर आधारित आहे. त्यांचे वक्तव्य हे तर्कावर आधारित असल्याचे मत महाराजांनी व्यक्त केले. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितले. (Car Loan: नवीन कार घ्यायचीये? मग प्रमुख बॅंकांचे ताजे व्याजदर जाणून घ्या) वारकरी सांप्रदायामध्ये या साहित्यकांनी डोकच घालू नये जगतगुरू तुकोबारा यांनी यांचा पहिल्यापासूनच निषेध केलेला आहे असं, ज्ञानेश्वर जोगदंड महाराज यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या