खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या, डोंबिवलीतील घटना

खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या, डोंबिवलीतील घटना

खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली (पश्चिम) मध्ये घडली आहे. सुभाषचंद्र हारके (वय-70) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

  • Share this:

डोंबिवली, 21 मे- खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना  डोंबिवली (पश्चिम) मध्ये घडली आहे.  सुभाषचंद्र हारके (वय-70) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आरोपी मुलगा अरविंद हारके (वय-40) याने क्षुल्लक कारणावरुन राहत्या घरी वडिलांची हत्या केली आहे. आरोपी अरविंद हारके याला पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडीत ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे दागिने पळवणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला पाजले विष..

दरम्यान, महाराष्ट्रात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची विष पाजून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात घडली होती. हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे मुलगा दररोज दारू पिऊन पैशांची मागणी करत शिवीगाळ करतो म्हणून आई-वडिलांनी चक्क मुलाला विष पाजल्याची कबुली दिली. अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील अरुण वाळवेकर आणि आई रेखा वाळवेकर यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मानलेला मामा आणि इतर अन्य दोघांचा समावेश आहे.

संतापजनक.. लग्नात आलेल्या गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाने केला बलात्कार

भावाने वडिलांच्या मदतीने केली बहिणीच्या प्रियकराची हत्या

चंद्रपुरातही हत्येची घटना समोर आली आहे. वडील आणि भावाने मुलीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. योगेश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथला रहिवासी होता.

योगेश जाधव याचे मुलीसोबत प्रेमसंबध होते. योगेशला रविवारी त्याच्या मैत्रिणीने भेटायला बोलवलं. पण मुलीसोबत भेट होण्यापूर्वी प्रभुदास धुर्वै आणि क्रिष्णा धुर्वै या पितापुत्राने चारगाव इथून योगेशला बळजबरीने मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत निलजईच्या जंगलात त्याला बेदम मारहाण करुन दगडाने ठेचून योगेशची हत्या केली.

VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी

First published: May 21, 2019, 6:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading