मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आईची माया आटली, घरकाम केलं नाही म्हणून 12 वर्षाच्या चिमुरड्याला दिले चटके

आईची माया आटली, घरकाम केलं नाही म्हणून 12 वर्षाच्या चिमुरड्याला दिले चटके

भांडी घासण्यास उशीर झाल्याने याच्या सावत्र आईने गॅसवर उलथणी गरम करुन चटका दिला

भांडी घासण्यास उशीर झाल्याने याच्या सावत्र आईने गॅसवर उलथणी गरम करुन चटका दिला

भांडी घासण्यास उशीर झाल्याने याच्या सावत्र आईने गॅसवर उलथणी गरम करुन चटका दिला

  • Published by:  Meenal Gangurde

नाशिक, 5 मार्च : नाशिकमधून एका 12 वर्षांच्या चिमुरड्यावर त्याच्या सावत्र आईने अत्याचार केल्य़ाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकाम न केल्याने या चिमुरड्याला त्याच्या सावत्र आईकडून चटके देण्यात आले आहेत. सावत्र आईविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथे राहणाऱ्या या चिमुरड्याला त्याच्या सावत्र आईने अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे. या मुलाला सावत्र आई घरातील काम करायला सांगायची आणि हे काम न केल्यास त्याला शिक्षाही केली जात होती. या छळाला कंटाळून मुलाने घरातून पलायन केले होते. नाशिक पोलिसांकडून या मुलाचा शोध घेतला जात होता. अखेर या मुलाचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या तपासात आईच्या क्रौर्याला वाचा फुटली आहे. या चिमुरड्याचा शोध लागल्यानंतर त्याला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. त्यात यासर्व बाबींचा खुलासा झाला. या प्रकरणात सावत्र आईविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा - मेघनाच्या मृत्युचं गूढ उकललं, जिम ट्रेनरच्या बॅगेतील गोळ्यांमुळे समोर आलं सत्य

काय आहे प्रकरण?

नाशिक रोड येथील एकलहरे कॉलनीतील ही घटना आहे. 29 फेब्रुवारी रोजी 12 वर्षांचा हा चिमुरडा घरातून अचानक गायब झाला होता. या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवटी एका रिक्षावाल्याला हा मुलगा सापडला. त्याने या मुलाला पोलिसांकड़े सोपवले. पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात दाखल केले होते. या मुलाने यावेळी त्याच्यासोबत घडलेले दुर्देवी कृत्य सांगितले. त्याची सावत्र आई वेळोवेळी त्याला मारहाण करीत होती. घरातील कपडे धुणे, फरशी पुसणे, घर झाडणे आदी कामे करायला सांगियची आणि हे केलं नाही तर अमानुष मारहाण करीत असल्याचे या मुलाने सांगितले.

हे वाचा - आई, मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनेल, नको ना सोडून जाऊ आम्हाला'

एके दिवशी भांडी घासण्यास उशीर झाल्याने याच्या सावत्र आईने गॅसवर उलथणी गरम करुन चटका दिला. तसेच मुलाच्या बहिणीलाही चटका दिल्याचे त्याने सांगितले. मुलाने सांगितल्यानुसार नाशिक पोलिसांनी या सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचा - 6 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या, फक्त 24 दिवसांत न्यायालयाने सुनावली फाशी

First published:

Tags: Boy, Mother, Nashik