नाशिक, 24जानेवारी : 'गावगुंड मोदी' च्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) आणि भाजपमध्ये (bjp) कलगीतुरा अजूनही सुरू आहे. 'गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. मुळाच भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे' असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे.
नाना पटोले हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांनी खोटा गावगुंड आणल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, 'गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे. असं असताना अजून काय राहिलं आहे. हे प्रश्न विचारण्यापेक्षा मी भाजपला बेरोजगारी, महागाई, गरिबांचे प्रश्न आहे. त्याबद्दल ती बोलत नाही.'
(या वेळात तुम्ही पालथं झोपण्याची चूक करत नाही ना? कमी वयातच वयस्क दिसाल)
तसंच, ज्या गावागुंडाने याबद्दल खुलासा केला आहे. ज्या मोदीचा उल्लेख झाला ते नाव फक्त एकच नाही. ललीत मोदी असतील, नीरव मोदी असतील हे सुद्धा मोदी आहेच. त्यामुळे भाजपवाल्यांना नेमकं झालंय तरी काय? माझे पुतळे जाळायचे असतील तर जाळा, माझा पुर्नजन्म होत आहे. तुम्हाला जितके पुतळे जाळायचे असेल जाळा आता एकदिवस तुम्हाला जनताच जाळणार आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला
'आम्ही मारामारीची भाषा करत नाही, आम्ही महात्मा गांधी यांच्या विचाराचे लोक आहोत. असे विचार काँग्रेस नेत्यांच्या मनात येऊ शकत नाही. हे विचार फक्त भाजपवाल्यांच्या मनात येऊ शकतात, अशी टीकाही पटोले यांनी केली.
(सावकाराने लेकाला डांबलं, जाचाविरोधात मातेचं उपोषण)
दरम्यान, आज पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या विरोधात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन केले. 'नाना पटोले यांनी महिला संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे नाना पटोले यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची गरज आहे, त्यासाठी मी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून नाना पटोले यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची विनंती करणार आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.