• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रोहित पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, म्हणाले....

रोहित पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, म्हणाले....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदत ही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. आम्ही सर्व आशावादी आहोत की...

  • Share this:
बारामती, 24 मे : तौक्ते चक्रीवादळानंतर (cyclone tauktae) आता राज्याला मिळणाऱ्या मदतीवरून महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या आहे.  'महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल' अशी अपेक्षा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली. बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार यांनी तौक्ते चक्रीवादळ, कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले. 'नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदत ही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. आम्ही सर्व आशावादी आहोत की, महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल', असं रोहित पवार म्हणाले. बाकीच्या लशी जातात कुठे?देशात महिन्याला 8.5कोटी डोसची निर्मिती मात्र वापर 5 कोटी 'महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसान ग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल', असंही रोहित पवार म्हणाले.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे Broccoli, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम!

'अखंड जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठीक ठिकाणी मोठी गर्दी होत होती.या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लशीची गरज असताना लशीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. देशात सध्या मोठ्या प्रमाणात लशीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडूयेथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लशीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरू करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
Published by:sachin Salve
First published: