राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास 100 टक्के अपयशी, भाजपची घणाघाती टीका

राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास 100 टक्के अपयशी, भाजपची घणाघाती टीका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 6 जून : 'कोरोना हाताळताना राज्य सरकार 100 टक्के अपयशी ठरलं आहे. या परिस्थितीवर आम्ही बोललो की आम्हाला राजकारण करतात म्हणून बोललं जातं. परंतु वस्तुस्थिती मांडणे, आहे ते दाखवणे याला पण राजकारण म्हणायचं असेल तर आम्हाला त्याची पर्वा नाही,' असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे, पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा येथे सुद्धा मुंबई आणि पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारन्टाइनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात येणारे बी-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या व कापूस,हरभरा, मका, तूर आदी धानाची खरेदी गतीने करण्याची मागणी यावेळी दरेकर यांनी केली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती संदर्भात जिल्ह्यातील कृषी व वैदयकीय विभागाचे अधिकारी, तसेच पोलीस यंत्रणांच्या अधिका-यांची बैठक घेऊन कोरोनाची स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंडे, नगर शहर अध्यक्ष भैय्या गांधी, निवासी जिल्हाधिकारी निचते, जिल्हा कृषी अधिकारी जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.सागळे, पोलिस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

First published: June 6, 2020, 11:56 PM IST

ताज्या बातम्या