मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले, विखे पाटलांची घणाघाती टीका

राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले, विखे पाटलांची घणाघाती टीका


'पेट्रोल डिझलचे दर केंद्र सरकारने आज कमी केले आहे सर्व केंद्र सरकारनेच करायचं का?

'पेट्रोल डिझलचे दर केंद्र सरकारने आज कमी केले आहे सर्व केंद्र सरकारनेच करायचं का?

'पेट्रोल डिझलचे दर केंद्र सरकारने आज कमी केले आहे सर्व केंद्र सरकारनेच करायचं का?

शिर्डी, 04 नोव्हेंबर : 'राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकारचे (mva gvernment) मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असून भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले आहे'  अशी जळजळीत टीका भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणी साखर कारखान्यात सपत्नीक लक्ष्मीपूजन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

' आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीये की प्रसन्न आहे? माहीत नाही मात्र हे स्वतःलाच लक्ष्मी करता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत मात्र महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी आहे. अशी अवस्था राज्याची झाली  आहे, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

PICS: नौशेरामध्ये जवानांना मिठाई भरवून PM मोदींनी साजरी केली दिवाळी

'केंद्र सरकारने आज पेट्रोल डिझलचे दर कमी केले आहे मात्र यावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचा समाचार घेतला. महसुलमंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय केंद्राने जीएसटी थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना? राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.

Allu Arjun आणि Ram Charanनं फॅमिलीसोबत केलं Pre-Diwali सेलेब्रेशन; Inside Photo

'पेट्रोल डिझलचे दर केंद्र सरकारने आज कमी केले आहे सर्व केंद्र सरकारनेच करायचं का? राज्य सरकारने कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मदत केली नाही. लसीकरणातही संधी होती मात्र केवळ पाहत बसले. राज्य सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी झालं असून केवळ दिवसा गणिक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत भ्रष्टाचाराचा सगळा उच्चांक महाविकास आघाडीने मोडला असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

First published: