मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एसटी कंडक्टर महिलेनं तरुण मुलासोबत रेल्वे इंजिनखाली घेतली उडी

एसटी कंडक्टर महिलेनं तरुण मुलासोबत रेल्वे इंजिनखाली घेतली उडी

आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

लासलगाव, 28 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथं  एसटी वाहक असलेल्या महिलेनं आपल्या तरुण मुलासोबत रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंजली  भुसनळे, उत्कर्ष भुसनळे अशी या दोघांची नावे आहे. आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली. राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत पडसाद, भाजपबद्दल नेत्यांनी उपस्थिती केले सवाल अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या. अंजली आणि त्यांच्या मुलाने आज सकाळी रेल्वे स्टेशनजवळ पोहोचल्या आणि समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वे इंजिनखाली उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6! पाहा VIDEO अंजली ह्या येवला बस आगारात वाहक म्हणून नोकरीला होत्या तर त्यांचा मुलगा उत्कर्ष याचं लॉकडाउन काळात लग्न झालेले असून त्याची पत्नी माहेरी गेलेली आहे. विशेष म्हणजे, भुसनळे कुटुंबीय येवल्यात राहत असताना त्यांनी 24 किमी लांब असलेल्या लासलगावला जाऊन ती देखील रात्री 2 वाजता आत्महत्या का केली ? असे काय घडले की दोघा मायलेकाने टोकाचे पाऊल उचलले असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.  धक्कादायक म्हणजे, आत्महत्या करताना दोघांनी एका कापडाने एकमेकांचे हात बांधून घेतले होते. या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या