खळबळजनक! जवानाने पत्नीवर झाडली गोळी, नंतर स्वत: केली आत्महत्या

खळबळजनक! जवानाने पत्नीवर झाडली गोळी, नंतर स्वत: केली आत्महत्या

अजय सिंग हा आपल्या पत्नीसह पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडार परिसरात राहत होता.

  • Share this:

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 02 जुलै : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथं एका भारतीय सैन्यातील जवानाने आपल्या पत्नीवर गोळी झाडून नंतर स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

अजय कुमार सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. तर  प्रियांका कुमारी असं त्याच्या पत्नीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  अजय सिंग हा आपल्या पत्नीसह  पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडार परिसरात राहत होता.

कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा कडकडीत लॉकडाउन

बुधवारी रात्री दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर अजय सिंग याने आपल्या सर्विस गनमधून पत्नी प्रियांकावर गोळी झाडली. यात जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अजयने स्वत: वर गोळी झाडली. यात  तो गंभीर जखमी झाला होता. गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता. प्रियांकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर अजय हा गंभीर जखमी झाला होता.  त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दारात वरात अन् पहिली बायको मंडपात! लग्न लागण्याआधीच वर पोहचला तुरुंगात

अजय सिंग हा  मुळचा बिहार राज्याचा रहिवासी आहे. त्याने आपल्या पत्नीवर गोळी का झाडली आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या का केली? याची नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading