भुजबळांच्या मतदारसंघात गुंडांचा उच्छाद, रात्रीच्या अंधारात दुकानावर चालवला जेसीबी, VIDEO

येवल्यातून जाणाऱ्या पुणे-इंदुर महामार्गाला लागून असलेल्या हुडको परिसरात प्रकाश कोल्हे यांची दुकानं आहेत. काही गुंडांनी प्रकाश कोल्हे यांच्याकडे गाळे विकत देण्याची मागणी केली होती.

येवल्यातून जाणाऱ्या पुणे-इंदुर महामार्गाला लागून असलेल्या हुडको परिसरात प्रकाश कोल्हे यांची दुकानं आहेत. काही गुंडांनी प्रकाश कोल्हे यांच्याकडे गाळे विकत देण्याची मागणी केली होती.

  • Share this:
येवला, 22 नोव्हेंबर : गाळे धारकाने दुकानं विकत देण्यास नकार दिल्यानंतर गुंडांनी जेसीबी लावून गाळे उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यात घडला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवल्यातून जाणाऱ्या पुणे-इंदुर महामार्गाला लागून असलेल्या हुडको परिसरात प्रकाश कोल्हे यांची दुकानं आहेत. सदर दुकानाच्या मागे मोठी जमीन असून तेथे जाण्यासाठी मोठा रस्ता नाही जर दुकानं हटवली तर त्या जागेचे महत्त्व वाढेल. त्यामुळे काही गुंडांनी गाळे मालक प्रकाश कोल्हे यांच्याकडे गाळे विकत देण्याची मागणी केली होती. मात्र, या दुकानावर 'माझं व माझ्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह आहेट, असे सांगत कोल्हे यांनी गाळे विकण्यास नकार दिला. कोल्हे गाळे विकण्यास तयार नसल्याचे पाहून गुंडांनी रात्री जेसीबीने गाळे उद्ध्वस्त करून फरार झाले. या घटनेमुळे येवल्यात  एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुंडांविरुद्ध भादवी 395 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, येवल्यात भूमाफियांनी डोके वर काढले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला असून येवला हा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी लक्ष घालून येवल्याला भयमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Published by:sachin Salve
First published: