मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दुकानदाराने दिले नाही आईस्क्रीम, पठ्ठ्याने फ्रीजच फोडले, वसईतला LIVE VIDEO

दुकानदाराने दिले नाही आईस्क्रीम, पठ्ठ्याने फ्रीजच फोडले, वसईतला LIVE VIDEO

वसईतील उच्चभ्रू कौल हेरिटेज सिटीतील दोषी-अगरवाल संकुलातील मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली

वसईतील उच्चभ्रू कौल हेरिटेज सिटीतील दोषी-अगरवाल संकुलातील मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली

वसईतील उच्चभ्रू कौल हेरिटेज सिटीतील दोषी-अगरवाल संकुलातील मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली

वसई, 24 डिसेंबर : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईजवळील वसईमध्येही (vasai) गुलाबी थंडी जाणवत आहे. पण या थंडीत चक्क थंडगार आईस्क्रीम ( ice cream) खायची लहर आलेल्या एका अज्ञात इसमाने मेडिकल शॉपमध्ये (Medical shop) आईस्क्रीम असून देखील ते देत नसल्याच्या रागाने फ्रीजच फोडून काढल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही (cctv) कॅमेरामुळे उघडकीस आली आहे.

वसईतील उच्चभ्रू कौल हेरिटेज सिटीतील दोषी-अगरवाल संकुलातील मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात रात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली असून तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमाने मात्र फ्रिजची तोडफोड केल्यानंतर तेथून पसार झाला आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या कर्मचाऱ्यांनी माणिकपूर पोलिसांत केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केल्याचे माणिकपूर पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कौल सिटी मधील दोषी अगरवाल संकुलात असलेल्या मे वेलनेस मेडिकल हे रात्र- दिवस उघडे असते त्यातच रात्रीच्या वेळी एक अज्ञात इसम मेडिकल शॉपमध्ये आल्यावर त्याने कुठल्याही प्रकारचे औषध-गोळी न मागता थेट शॉप बाहेर असलेल्या फ्रीजमधील आईस्क्रीमची मागणी केली. फार्मासिस्टने आपल्याला केवळ औषधेच मिळतील तर नियमानुसार, आम्हाला यावेळी आईस्क्रीम विक्री करता येणार नाही, असे सांगतील. पण,  या इसमाने रागाच्या भरात शॉप बाहेरील त्या आईस्क्रीम फ्रीजची सॅनिटाईजर स्टँडच्या सहाय्याने तोडफोड केली व तेथून पळून  गेला.

दरम्यान, घडलेला सर्व प्रकार हा शॉपच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून माणिकपूर पोलीस आता या तोडफोड करण्याऱ्या इसमाचा शोध घेत आहेत तर माणिकपूर पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन शोध सुरू केला आहे.

First published: