पैसे जमा करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीसोबत बारामतीच्या मुख्य चौकात घडला धक्कादायक प्रकार

पैसे जमा करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीसोबत बारामतीच्या मुख्य चौकात घडला धक्कादायक प्रकार

कर्मचाऱ्यासोबत बारामती शहरातील मुख्य चौकात धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

बारामती, 5 मार्च : बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असतानाच कर्मचाऱ्यासोबत बारामती शहरातील (Baramati) मुख्य चौकात धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगावर खाज येण्याची पावडर टाकून कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित करत त्याच्याकडील बॅगेतील 2 लाख 41 हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना शहरातील भिगवण चौकात (Bhigwan Chowk) घडली आहे.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्वप्निल विलास पवार (रा. इको व्हिलेज बिल्डींग, कसबा, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. ते येथील महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह प्रा. लि. मध्ये काम करतात.

शोरुमचे संचालक सचिन सातव यांच्या घरून त्यांनी 1 लाख 41 हजार 800 रुपयांची रक्कम आणली होती. ती एका बॅगेत भरून ते भिगवण चौकात बारामती सहकारी बॅंकेत आले आणि बॅंकेतून आणखी एक लाख रुपये काढून त्यांनी ते बॅगेत ठेवले. चालत ते दुचाकीकडे येत असताना तोंडाला पांढरा रुमाल बांधलेल्या एका युवकाने किस का पैसा निचे गिरा है, अशी विचारणा त्यांच्याकडे केली.

हेही वाचा - शारिरीक संबंधांना नकार दिल्यानं अल्पवयीन मुलाकडून दिव्यांग मुलीची हत्या, फोनमध्ये आढळले पॉर्न व्हिडीओ

फिर्य़ादीने खाली पाहिले असता तेथे 20 व 10 रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. फिर्य़ादी त्या घेण्यासाठी खाली वाकले असता त्यांच्या मानेवर व कॉलरवर काही तरी पडल्याची जाणीव झाली. मान खाजवू लागल्याने ते जवळच्या चहाच्या गाड्यावर जात मान धुवत असताना पैशाची बॅग त्यांनी शेजारील स्टुलावर ठेवली होती.

शर्ट घालत असताना ही बॅग त्यांना दिसली नाही. त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता तो युवक तेथून पसार झाल्याचे दिसून आले. या बॅगेत 2 लाख 41 हजार रुपयांची रक्कम, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट, महालक्ष्मी मुव्हर्स प्रा. लि. चे तीन चेकबुक, पासबुक, एटीएम असे साहित्य होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: March 5, 2021, 6:06 PM IST

ताज्या बातम्या