धक्कादायक! तपासणी सुरू असताना 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले, तालुक्यात खळबळ

धक्कादायक! तपासणी सुरू असताना 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले, तालुक्यात खळबळ

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालं असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे.

  • Share this:

सोलापूर, 9 जुलै : सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालं असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोडवरील क्वारन्टइन सेंटरमधील चार रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोव्हिड सेंटरमधील रुग्णांची तपासणी सुरू असताना क्वारन्टाइन केलेले चार जण पळून गेले आहेत. हे चारही जण हायरिस्क रुग्ण असल्याची माहिती आहे. त्यामुळे बार्शीकरांची चिंता वाढली आहे. याबाबत या चौघांविरुध्द कोविड 19 चा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्याने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध भुजबळ यांनी याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे चौघांविरुध्द रोगप्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - भारतावरील कोरोनाचं संकट आणखी गडद, रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 549 इतकी झाली आहे. तर यामध्ये 317 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 1804 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत तर उर्वरीत 1428 जणांवर उपचार सुरु आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी राज्यशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही सोलापुरातील कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसत नाही.

मृत्यूदराबाबतही सोलापूर देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याने खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच काळजी व्यक्त केली होती. त्यामुळे रुग्णांचे अशा पध्दतीने पलायन करणे आणखी धोकादायक आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 10:34 AM IST

ताज्या बातम्या