मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातील धक्कादायक घटना, व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला 11 व्या मजल्यावरुन ढकललं

पुण्यातील धक्कादायक घटना, व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला 11 व्या मजल्यावरुन ढकललं

व्याजाच्या पैशावरुन दोघांमध्ये मारहाण झाली होती त्यातच आरोपीने...

व्याजाच्या पैशावरुन दोघांमध्ये मारहाण झाली होती त्यातच आरोपीने...

व्याजाच्या पैशावरुन दोघांमध्ये मारहाण झाली होती त्यातच आरोपीने...

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 10 मार्च : पैशावरुन झालेल्या वादातून पुण्यातील (Pune) एका तरुणाला 11 मजल्यावरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा (kondhwa) परिसरात घडली आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर चिलवेरी (वय 24) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकातील पूल हौंसिग या इमारतीतील 11 व्या मजल्यावर चिलवेरी कुटुंब राहतात. त्यांनी आरोपीकडून 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. आरोपी पैसे मागण्यासाठी चिलवेरी यांच्या घरी आला होता. पैशावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपीसोबत आणखी दोघेजण होते. यावेळी पैसे न दिल्याच्या रागात आरोपींनी चिलवेरीला 11 व्या मजल्यावरुन ढकलून दिले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोंढवा पोलिसांकड़ून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हे वाचा - मानलं पुण्यातल्या रिक्षा चालकाला, 16 लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत

First published:

Tags: #Pune, 1 death, Interest