मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साखरपुडा का केला? कात्रीने केले तरुणीवर सपासप वार, लोकांनी तरुणाला पकडून धू-धू धुतले!

साखरपुडा का केला? कात्रीने केले तरुणीवर सपासप वार, लोकांनी तरुणाला पकडून धू-धू धुतले!

मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथं ही घटना घडली.

मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथं ही घटना घडली.

मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथं ही घटना घडली.

  • Published by:  sachin Salve
टाकळघाट, 17 मार्च : नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथं एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणावर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्ला करून पळ काढणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडले आणि बेदम धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास टाकळघाट इथं ही घटना घडली. या परिसरात एका फार्मसीमध्ये 20 वर्षीय तरुणी साफसफाईचे काम करते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ती कामासाठी पोहोचली. काही वेळानंतर आरोपी शुभम काकडे(वय 23) तिथे पोहोचला. त्याने या तरुणीशी वाद घातला. त्यानंतर दुकानातील कात्रीने या तरुणीवर हल्ला चढवला. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील दुकानदार आणि फार्मसीच्या मालकाने धाव घेऊन आरोपी तरुणाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी या तरुणाची बेदम धुलाई केली. तर कात्रीने वार झाल्यामुळे जखमी झालेल्या तरुणीला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर एका खासगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं. जखमी झालेली तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही एकाच वस्तीत राहतात. शुभम हा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करतो.  दोघांमध्ये या आधी प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली. परंतु, दोनच दिवसांपूर्वीच या तरुणीचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे या तरुणाने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. लोकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी शुभमची प्रकृती बिघडली असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या