मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाचे नवे संकट, 1 डिसेंबरला शाळा उघडणी लांबणीवर पडण्याची शक्यता, टोपेंनी दिले संकेत

कोरोनाचे नवे संकट, 1 डिसेंबरला शाळा उघडणी लांबणीवर पडण्याची शक्यता, टोपेंनी दिले संकेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून...

जालना, 27 नोव्हेंबर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद पडलेल्या शाळा अखेर 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. पण ओमीक्रोन व्हेरिएंट(Coronavirus new variant Omicron) साऊथ आफ्रिकेत आढळला आहे, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उद्या बैठक बोलावली आहे. त्यामुळे शाळा (school open) उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमीक्रोन व्हेरिएंट साऊथ आफ्रिकेत आढळला त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतात अजून या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नाही.  महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. अशातच शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे.

मात्र उद्या रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. त्यामुळे शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला जाणार असल्याने शाळा उघडणी लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आधी नंबर ब्लॉक केला, आता राखी पतीसोबत बिग बॉसमध्ये करणार सुहागरात

तसंच, सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेली मुंबईची लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता असताना आता ओमीक्रोनमुळे पुन्हा धूसर होण्याची शक्यता आहे. ओमीक्रोनचा हवाला देत आरोग्यमंत्री टोपेंनी लोकल ट्रेनचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलावला आहे.

जगातला पहिला 18GB RAM असणारा Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाईन असून ती सुरू करण्याबाबत लोकांना अपेक्षा असते पण त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आपण आहोत. मुंबईत आता मुश्किलने रोज फक्त दोन एकशे रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर जवळपास100 टक्के लसीकरण देखील झालेलं आहे. तरी यासर्व निकषांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना टास्क फोर्स आणि आमच्या आरोग्य विभागाच्या उपलब्ध माहितीवरून योग्य ते निर्णय घेतला जाईल, असं म्हणत राजेश टोपे यांनी लोकल ट्रेनबाबतचा निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलविला.

First published:

Tags: School