मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील 16 मंत्र्यांकडून 90 हजार कोटींचा घोटाळा,धनंजय मुंडेंचं आरोपास्त्र

राज्यातील 16 मंत्र्यांकडून 90 हजार कोटींचा घोटाळा,धनंजय मुंडेंचं आरोपास्त्र

याचा पुरावाही देतो. जर नाही दिला तर मला फाशी द्या असं आव्हानच धनंजय मुंडेंनी केलाय.

याचा पुरावाही देतो. जर नाही दिला तर मला फाशी द्या असं आव्हानच धनंजय मुंडेंनी केलाय.

याचा पुरावाही देतो. जर नाही दिला तर मला फाशी द्या असं आव्हानच धनंजय मुंडेंनी केलाय.

पंढरपूर, 13 एप्रिल : राज्यातील 16 मंत्र्यांनी 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी केलाय. पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावेळी ते बोलत होते. या हल्लाबोल यात्रेत यावेळी अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. भाजप शिवसेना जातीवादी पक्ष समाजात तेड निर्माण करत आहेत. उत्तरप्रदेशमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे यातून त्यांची मानसिकता दिसतं आहे अशी टीका अजित पवारांनी केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या चिट्टीत मोदींचं नाव असून त्यांना अटक का नाही ?? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.  ते पुढे म्हणाले, राज्यातील मंत्र्यांनी साडे तीन वर्षात 900 हजार कोटींचा घोटाळा केलाय. याचा पुरावाही देतो. जर नाही दिला तर मला फाशी द्या असं आव्हानच धनंजय मुंढेंनी केलाय. 2019 ला होणाऱ्या लोकसभेत मोदी भाषण काय देणार हा प्रश्न आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी मोदींची नक्कल केली. तर पुरंदर विमानतळ होणार पण तुमच्या परवानगी शिवाय मी होऊ देणार नाही अशा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. मोदींनी भाषणात सांगितलं होतं मला पंतप्रधान नको चौकीदार बनवा पण चौकीदार असून रोज चोरी होत असेल तर त्याला काढून टाकायला हवं असा टोला जयंत पाटलांनी मोदींना लगावला.
First published:

Tags: NCP, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, पंढरपूर, राष्ट्रवादी, सुप्रिया सुळे, हल्लाबोल यात्रा

पुढील बातम्या