Home /News /maharashtra /

पोलिसांसमोरच दोघे भिडले, एकमेकांवर केले कोयत्याने सपासप वार

पोलिसांसमोरच दोघे भिडले, एकमेकांवर केले कोयत्याने सपासप वार

साताऱ्यातील सैदापूर येथे राहणाऱ्या सुरेश दुबळे आणि रामा दुबळे यांच्यात गावी वाद झाला होता.

    किरण मोहिते, प्रतिनिधी सातारा, 04 जून :   सातारा तालुका पोलीस स्टेशन समोरच धारदार कोयत्याने एकमेकांवर वार केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली. हा हल्ला पोलिसांच्या समोर झाला असून यामधे दोघेही गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आज सकाळी 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली.   दोघांमध्ये जुना वाद असल्याने ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर हा राडा झाला. हेही वाचा -राजभवनाच्या दारावर ‘चक्रम’ वादळे, सेनेचा आशिष शेलारांना सणसणीत टोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील सैदापूर येथे राहणाऱ्या सुरेश दुबळे आणि रामा दुबळे यांच्यात गावी वाद झाला होता. त्यातून ते गुरुवारी सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सुरेश दुबळे याने आणलेल्या कोयत्याने रामा दुबळे याच्यावर पहिला वार केला. सुरेशने अचानक केलेल्या हल्लामुळे एकच गोंधळ उडाला. दोघांमध्ये झटापट झाली आणि रामाने सुरेशच्या हातातून कोयत्या हिसकावून घेतला आणि त्याच धारधार  रामाने सुरेश याच्यावर वार केला. हेही वाचा -मोठी बातमी! पुण्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, मायलेकासह चार जणांचा मृत्यू दरम्यान थेट पोलिस ठाण्यात हल्ला झाल्याने पोलिसांची धावाधाव उडाली. दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना समजताच सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या