अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेली अटक निषेधार्ह-सनातन

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांना केलेल्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 08:00 PM IST

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेली अटक निषेधार्ह-सनातन

मुंबई, 25 मे- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांना केलेल्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. सनातन संस्थेचे  राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रक काढून संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना केलेली अटक ही निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.

केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षडयंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला. ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवा, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा दिल्याचे चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.


दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने शनिवारी सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. सीबीआयचे अधिकारी दोघांना पुण्यात घेऊन गेले आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता पुणे कोर्टात या दोघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

सनातन संस्थेचे सल्लागार असलेले संजीव पुनाळकर गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर आज सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत पुनाळकर यांचे नाव पुढे आल्याची सुत्रांची माहिती आहे. पुनाळकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती.

Loading...

डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोळकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.


VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...