भिवंडीत घराचे छत कोसळलं, लहान मुलगा आणि तीन महिला जखमी

हॉटेल जवळ नवीन इमारतीचे काम सुरू असताना इमारतीवरील साचलेले पाणी पडल्याने घराचं छत कोसळंलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 08:26 PM IST

भिवंडीत घराचे छत कोसळलं, लहान मुलगा आणि तीन महिला जखमी

रवी शिंदे 5 ऑगस्ट : भिवंडी शहरातील किडवाई नगर इथं झालेल्या घटनेत 4 जण जखमी झाले. चांदणी हॉटेल जवळ नवीन इमारतीचे काम सुरू असताना इमारतीवरील साचलेले पाणी पडल्याने घराचं छत कोसळलं यात 1 लहान मुलगा आणि 3 महिलांचा त्यात समावेश आहे. जखमींना इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये बनोबी शेख हुसैन 61, रुसबा शेख हुसैन 24, लतीफा कायूम शेख 35, हमजा इमरान शेख 1.6 अशी जखमींची नावं आहेत.

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री उतरले पाण्यात

सांगली - कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: पाण्यात उतरले आणि  लहान मुलीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन कंबरे एवढ्या पाण्यातून तिला बाहेर काढलं. वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचं समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावाला त्यांनी भेट दिली आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. तसच गावातील लहान लेकरांना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली.

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

Loading...

यावेळी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. त्यामुळे NDRF च्या पुणे व कोल्हापूर वरून 2 टिम व कोल्हापूर येथील  ट्रेकर्स टीम घटनास्थळी दाखल होत आहेत. ही पथकं काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी दाखल करणार आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नागेश पाटील व तहसीलदार सुनील शेरखाने व तालुका कृषी अधिकारी भगवान माने हे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...