Home /News /maharashtra /

गाढ झोपेत होतं गाव, रात्रीच्या अंधारात कुऱ्हाडी-कोयते घेऊन घुसले दरोडेखोर आणि...

गाढ झोपेत होतं गाव, रात्रीच्या अंधारात कुऱ्हाडी-कोयते घेऊन घुसले दरोडेखोर आणि...

गावात घुसल्यानंतर दरोडेखोरांनी चार वेगवेगळ्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

उस्मानाबाद, 14 जून : उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगावात  दरोडेखोरांनी हैदोस घातला आहे. एकाच रात्री दरोडेखोरांनी घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि सोनं चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली आहे. यात 3 जण जबर जखमी झाले आहे. शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी पारगावात हल्ला केला होता. गावात घुसल्यानंतर दरोडेखोरांनी चार वेगवेगळ्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. कुऱ्हाडी आणि कोयते घेऊन या दरोडेखोरांनी गावकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील कपाटं फोडली आणि सोनं, रोख रक्कम लंपास केली. हेही वाचा - माहिती आहे का? रक्तदान केल्याने फक्त गरजूलाच नाही तर तुम्हालाही होतो फायदा दरोडेखोरांनी गावातील अण्णा मनोहर डोके यांच्या घरावर दरोडा टाकला असता त्यांनी त्या चोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने आणि तलवारीने वार करून त्यांना गंभीर इजा पोहोचवली. त्यानंतर गावचे माजी सरपंच महादेव रावजी आखाडे यांच्या घरावर त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता  महादेवराव हे जागी असल्याचे लक्षात आले असता  चोरट्यांनी तिथून पलायन केले. भुसार मालाचे व्यापारी अरुण दगडू मोटे यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यावेळेस त्यांनी त्या चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अरुण दगडू मोटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि त्यांच्या पत्नी कालींदा अरुण मोटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. घरातील काही लाखांचा ऐवज लंपास केला आहे. हेही वाचा - कर्क आणि तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आहे शुभ दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य या दरोडेखोरांनी  चोरीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना जबर मारहाण या मारहाणीत 3 गावकरी जबर जखमी झाले आहे. जखमी गावकऱ्यांवर बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पती-पत्नीवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांना शोध सुरू केला आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, दरोडेखोर

पुढील बातम्या