मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बारामतीतील त्या 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, पण दोन महत्त्वाचे रिपोर्ट येणे बाकी

बारामतीतील त्या 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, पण दोन महत्त्वाचे रिपोर्ट येणे बाकी

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शहरात सातवा रूग्ण सापडल्यानंतर नातेवाईकांमधील 14 जणांची तपासणी करण्यात आली.

बारामती, 16 एप्रिल : आधी फक्त मोठ्या शहरांमध्ये मर्यादित असलेला कोरोना व्हायरसने आता काही प्रमाणात ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. बारामतीमध्येही आतापर्यंत 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सातवा रूग्ण सापडल्यानंतर नातेवाईकांमधील 14 जणांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

एकीकडे नातेवाईकांमधील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरीही कुटुंबातील मुख्य दोन जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच कोठून या कोरोनाचा संसर्ग झालाय ते स्पष्ट होणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामतीतीलही धोका आणखी वाढला असून आता शहरात कडक अंमलबजावणी राबवली जात आहे.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बारामतीचा नवा पॅटर्न

बारामती शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलिस कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही.

बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लॉकडाऊनच्या कालावधीत 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. हे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार असून त्या नागरिकांना स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर दिला जाणार आहे. ज्या कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल त्या नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला जाणार आहे.

नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तू मिळणार आहे. त्यात भाजीपाला, औषधे आदी देण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा व्हायरस संसर्ग मुळापासून नष्ट करता येईल. नागरिकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील. पोलिसांना शहरात गस्ती करीता तात्काळ संपर्काकरता वाकी-टॉकी देण्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचणार आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: Baramati, Coronavirus