कुत्र्याच्या पिल्लाला शेकोटीमध्ये जिवंत जाळले, नागपूरमधील संतापजनक घटना

कुत्र्याच्या पिल्लाला शेकोटीमध्ये जिवंत जाळले, नागपूरमधील संतापजनक घटना

प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिल्लाला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर, 05 फेब्रुवारी : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या  प्रतापनगरात (Pratapnagar) कुत्र्याच्या एका निष्पाप पिल्लाला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  या घटनेनंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची भावना असून पोलिसांत देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन'च्या संस्थापिका स्मिता मिरे या गुरुवारी सकाळी त्यांच्या श्वानाला फिरवण्यासाठी गेल्या असता. प्रतापनगरातील गणेश कॉलनीतील मैदानाजवळ त्यांना काहीतरी जाळल्याचे दिसून आले.

काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल, प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवणार नवी जबाबदारी!

त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना दीड ते दोन महिन्याचे कुत्र्याचे पिलू जळलेल्या अवस्थेत दिसून आले.  त्यांनी जवळपास विचारणा केली असता हा प्रकार कधी झाला व कुणी केला याबाबत कुणालाही काहीच कल्पना नव्हती.

...आणि अजिबात चालता न येणारा कुत्रा धावू लागला, भावुक करणारा VIDEO VIRAL

त्यानंतर स्मिता मिरे यांनी थेट राणा प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात  अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये सुद्धा अज्ञात माथेफिरु एका कुत्र्याला जिवंत जाळले होते.

Published by: sachin Salve
First published: February 5, 2021, 1:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या