Home /News /maharashtra /

कोरोनाच्या काळात सरकारची डोकेदुखी वाढली, सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

कोरोनाच्या काळात सरकारची डोकेदुखी वाढली, सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

बुधवार 5 जुलै 2020 रोजी लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या 15 दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे.

बुधवार 5 जुलै 2020 रोजी लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या 15 दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे.

एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

सांगली, 12 मे : सांगली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहेत. खानापूर तालुक्यातील विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अजून अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना 3 मे रोजी मारहाण केली होती. आठवडा होऊनही गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला अटक न झाल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असतानाच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा येथील तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी साडेसात लाखांचा दंड ठोठावला होता. या वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसीलदारांकडे करत होते. मात्र, तहसीलदार यांनी सर्व दंड भरावाच लागेल, अशी सूचना दिली होती. हेही वाचा - पोलिसांची मदत करणाऱ्या शिक्षकाला ट्रकने चिरडलं, जागीच ठार याचा राग मनात धरून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या एका साथीदाराने तहसील कार्यालयाच्या आवारातच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना बेदम मारहाण केली. यात तहसीलदारांनी गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी खुद्द तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Sangali news

पुढील बातम्या