अबब...रक्षाबंधानासाठीच्या या 'गोल्डन' मिठाईचा भाव ऐकला तर तुम्ही चाटच पडाल!

अबब...रक्षाबंधानासाठीच्या या 'गोल्डन' मिठाईचा भाव ऐकला तर तुम्ही चाटच पडाल!

गोल्डन बदाम कतली, गोल्डन राखी, गोल्डन विल्कुट, गोल्डन सँडविच या चार प्रकारात आहे ही मिठाई तयार करण्यात आलीय.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक 14 ऑगस्ट : रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अनोख्या नात्याचा उत्सव अगदी तोंडावर आलाय. प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला खास खास बनवलेली मिठाई खाऊ घालायची इच्छा असते. आणि बहिणीलाही खास भेट देण्यासाठी भाऊ इच्छुक असतात. आता हेच तोंड गोड करणारी खास मिठाई नाशकात लोकप्रिय झालीय. गोल्डन वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत मात्र ऐकली तर अनेकांचे डोळे मात्र पांढरे होताय. तब्बल 9 हजार किलोची ही मिठाई अनेक ग्राहक खरेदीही करताय. कारण  हौसेला काही मोल नसतं.

टीकेनंतरही मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा पुन्हा सुरू होणार! या आहेत तारखा

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरचं 'सागर स्वीट'सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. या मिठाईच्या दुकानावर  सध्या तुफान गर्दी आहे. या गर्दीचं कारण म्हणजे इथं मिळणारी खास गोल्डन मिठाई. गोल्डन बदाम कतली, गोल्डन राखी, गोल्डन विल्कुट, गोल्डन सँडविच अश्या चार प्रकारात आहे ही मिठाई तयार करण्यात आलीय. ड्रायफ्रूटस, काजू, बदाम, पिस्ता यावर खास गोल्डन वर्ख देण्यात आलाय. तब्बल 24 कॅरेट सोन्याचा हा खास मुलामा हे या मिठाईचं खास आकर्षण आहे. त्यामुळे या मिठाईची किंमत आहे चक्क 9 हजार रुपये किलो असल्याचं या दुकानाचे मालक दीपक चौधरी यांनी सांगितलंय.

युरोपच्या सर्वोच्च शिखराजवळ 'मावळ्यां'नी फडकवला 73 फुटाचा तिरंगा

खास रक्षाबंधनसाठी अशी 10 किलो ही खास मिठाई त्यांनी तयार केलीय. उत्सुकता असल्यानं,अवघा 1 पीसही ग्राहक खरेदी करताय. एकाच दिवसात त्यांची चक्क 3 किलो मिठाईची विक्रीही झालीय. दरवेळी काही तरी वेगळं करायचं या छंदातून चौधरी नियमित प्रयोग करीत असतात. ग्राहकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...